गोविंदच्या अपंगत्वाला मिळाला ठाणे विद्यादान मंडळाचा आधार!
सुभाष हरड
शहापूर : दोन्ही पायाने अपंग असलेल्या गोविंद बांगर या ११ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यासाठी चाललेल्या धडपडीला ठाणे येथील विद्यादान सहाय्यता मंडळाने प्रोत्साहन दिले असून, त्याच्या संपूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी सहाय्य करून पालकत्व स्वीकारले आहे. ठाणे वृत्तान्तमध्ये ‘दोन्ही पाय लुळे, तरीही शिक्षणासाठी परिस्थितीशी दोन हात..’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
गोविंद बांगर हा जन्मजात दोन्ही पायांनी अपंग असलेला विद्यार्थी मूळचा शहापूर तालुक्यातील टाकीपठार या अतिदुर्गम भागातील टिकबायचा पाडा या गावातला. सध्या तो पद्मश्री अण्णासाहेब जाधव संचालित सरळगाव येथील वसतिगृहात राहतो. व सरळगाव (ता. मुरबाड) येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत कला शाखेत शिकत आहे. १० गुंठे जमीन असलेले व दारिद्रय़ रेषेखालील आईवडील मोलमजुरी करून गोविंदचे भवितव्य घडवीत आहेत. सरळगाव हायस्कूलचे प्राचार्य चंद्रकांत थोरात व शिक्षक गोविंदचा हौसला बुलंद करीत आहेत.
या जिद्दी गोविंदची कहाणी ‘वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध होताच ठाणे येथील विद्यादान सहाय्यता मंडळाचे भाऊ नानिवडेकर, गीता शहा, अंजना कुलकर्णी, जोगळेकर यांनी गोिवद शिकत असलेल्या सरळगाव हायस्कूलला भेट दिली व गोिवदच्या शिक्षणासाठी व त्याला पुढे मोठे होण्यासाठी विद्यादान मंडळाने सर्व पाठबळ देण्याचा शब्द विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत थोरात यांनी दिला. त्यावेळी विद्यादान सहाय्यता मंडळासारखी जाणीव असलेली सहृदयी माणसे समाजात आहेत याची प्रचिती आली. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते.गोविंद या जिद्दी मुलाचे शिक्षणाचे स्वप्न साकारावे याकरिता डोंबिवली (पूर्व) येथील कुमार भालके गुरुजी यांनीही थेट सरळगाव हायस्कूल गाठून गोविंदला पाच हजार रुपयांची मदत केली आहे. तर गोविंद शिकत असलेल्या सरळगाव हायस्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे देऊन एकाच दिवशी सुमारे सहा हजार रुपये जमा करून गोविंदच्या धडपडीला अनोखा सलाम केला आहे.
सरळगाव हायस्कूलमध्ये गोविंदचे पालकत्व घेण्यासाठी आलेल्या विद्यादान मंडळाने गोविंदच्या शिक्षकांचेही कौतुक केले. यावेळी सरळगाव हायस्कूलच्या शालेय समितीचे चेअरमन नारायण घुडे व सदस्य काशिनाथ झुंजारराव उपस्थित होते. ठाणे येथील विद्यादान मंडळाच्या पालकत्वामुळे गोविंदच्या शिक्षणाला आता एकप्रकारे पालवीच फुटली आहे.दोन्ही पाय अधू असलेल्या गोविंदला कधी सरपटत जाऊन तर कधी आई-वडील पाठीवर घेऊन शाळेला पाठवीत होते. काहींनी तर गोविंदला शिकविण्यापेक्षा रेल्वे स्टेशनवर सोडून देऊन पैसे कमविण्याचा सल्ला दिला होता, असे गोविंदच्या आई-वडिलांनी सांगताच सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले. मात्र दारिद्रय़ाशी झगडत गोिवदला शिक्षणाची कवाडे खुली करून गंगाराम बांगर व आई सुनीता बांगर यांनी ध्येयवादी पित्याची भूमिका साकारली आहे. अधिक मदतीसाठी भाऊ नानिवडेकर यांच्याशी (९९२०३६७५७०) संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment