Thursday, 22 January 2015

Award for Rameshwari Thorat Research Meet and Science Exhibition


Rameshwari Thorat (in black dress) our student doing SY BSC in Statistics got first prize in Research Meet and Science Exhibition and their topic was Survey On Library-A source of knowledge.


Below is the brief of the project in her own words - 

The name of my event was 
RESEARCH MEET AND SCIENCE EXHIBITION 2015.The name of our topic was Survey on Library. There were two groups of Statistics department participated in Research Meet. In each group there were 3 people. The objectives were, to study reading habits of students and staff. To find perspective of students towards visiting the library. To survey the various facilities provided by the library. To study challenges faced by library staff and students. Our Statistics teachers helped us so much. We collected data, analyzed it and made power point presentation within a week. Only 8 minutes were given to each group for presentation. All the departments had participated in this event and at least one winner was there from each department. Research meet was organized by our Mithibai College on 15th January 2015.


This has brought to our attention by Mr. & Mrs. Malshe who are her KP's staying at Kandivali and are ably guiding Rameshwari in her career path successfully. VSM family congratulates both!

Regards,
VSM Family

Tuesday, 20 January 2015

‘विद्यादान’ हेच श्रेष्ठ दान - प्रथमेश मस्कर (Source: मुंबई तरुण भारत)


आपला समाज अनेक स्तरांमध्ये विभागलेला आहे. खरं तर आपणच त्याचे तसे वर्गीकरण केले आहे. शिकलेला शिक्षित आणि न शिकलेला अशिक्षित अशी वर्गवारी आपण लगोलग करतो. परंतु, एखादी व्यक्ती का शिकली नसेल? जीवनात त्याला कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागले, हे आपल्याला ठाऊक नसते. बरेचदा आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षणही होत नाही. हाच धागा पकडून ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ या सामाजिक संस्थेने विद्यादानाचा अभिजात वारसा राबविला आहे. तेव्हा, आज या संस्थेची विस्तृत माहिती करुन घेऊया...
काही दिवसांपूर्वी विद्याविहार रेल्वे स्थानकावर एका मित्राची वाट पाहात उभा होतो. सौमय्या महाविद्यालयातील मुलामुलींमुळे स्थानक पुरतं गजबजलेलं असतं, तसं ते आजही होतं. ’’आपण जे शिक्षण घेतोय त्याचा काही उपयोग नाही’’, असे वाक्य एका घोळक्यातून कानावर पडले. मी लगेच माझे कान आणि डोळे त्या आवाजाच्या दिशेने टवकारले. ’’अरे...तुम्ही माझं ऐका अल्बर्ट आईन्स्टाईनपासून ऍपलचा स्टीव्ह जॉब्स ते आजच्या फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग यांनी कुठलं शिक्षण घेतलं? ते कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत? कोणती पदवी आहे त्यांच्याकडे?’’ घोळक्यातील एक विद्यार्थिनी म्हणाली, ’’हे दिग्गज शाळेत गेले नसतीलही; परंतु जगण्यासाठी जे काही बेसिक शिक्षण लागतं ते त्यांनी आत्मसाद केलं होत आणि म्हणूनच त्यांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान पादाक्रांत केलं!’’ तेवढ्यात लोकल आली आणि प्लॅटफॉर्मवरची गर्दी दिसेनाशी झाली. कदाचित, त्या मुलीच्या उत्तराने नक्कीच त्या मुलांना शिक्षणाचे सामर्थ्य उमगले असेलही... परंतु, तेवढ्यात एक प्रश्‍न पडला की, शहरी भागात शिक्षणाबद्दल एवढी नकारात्मता असेल तर ग्रामीण भागात, खेडोपाड्यात शिक्षणाची अवस्था काय असेल? तेथील मुलांना कोण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असेल?

आपल्या समाजात अनेक सामाजिक संस्था कार्यरत असतात. याच संस्था समाजातील अनेक विषयांचे प्रश्‍न आपापल्यापरीने मार्गी लावतात. ’विद्यादान सहाय्यक मंडळ’ ही सामाजिक संस्था ग्रामीण भागात, खेडोपाडी तसेच अनेक वनवासी पाड्यातील मुलांच्या शिक्षणकार्यात मदत करते. शहरी मुलांबरोबर खेड्यातील मुलांनीही शालेय शिक्षण घेऊन शहर आणि ग्रामीण भागामधील दरी मिटवून टाकण्यासाठी ’विद्यादान सहाय्यक मंडळा’ची स्थापना केली गेली.

पत्रकारितेमधून संस्थेची निर्मिती

आपल्या देशातील सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे ग्रामीण भाग. रस्ते, पाणी, वीज तसेच इतर पायाभूत सोईसुविधांची वानवा असलेली हजारो खेडी... तर दुसरीकडे शहरांमध्ये उद्योगधंद्यांना चालना मिळते आणि रोजगाराच्या संधीही त्यामुळे उपलब्ध होतात. परंतु, ग्रामीण भागात असे आशावादी चित्रही नाही आणि त्यामुळे हा भाग अधिकच मागासलेला दिसतो. 
ठाणे ग्रामीण भागाच्या वृत्तांकनाची जबाबदारी सुभाष हरळ या पत्रकाराकडे होती. एक पत्रकार आणि त्याचबरोबर एक शिक्षक, अशा दुहेरी जबाबदारीचा समन्वय साधून ते या भागाची आपल्यापरीने सर्वोतोपरी मदत करी. हरळ यांचे वर्तमानपत्रातील लेख ठाण्यातील काही संवेदनशील नेत्यांनी वाचले. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या हेतूने काही ठाणेकरांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये भाऊ नानिवडेकर, गीता शहा, स्वाती आगते, रंजना कुलकर्णी व गोपाळ आठवले ही नावं पुढे होती. साधारण २००८ साली ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रासाठी उत्तमातील उत्तम यंत्रणा उभारावी यासाठी ही सारी मंडळी एकत्र आली आणि स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २००८ साली ’विद्यादान सहाय्यक मंडळाची’ (व्हीएसएम) स्थापना करण्यात आली.

खेड्यातील मुलांसाठी ’विद्यादान’

ग्रामीण भागातील ’विद्यादाना’साठी संस्थेने शहापूर, मुरबाड, नळगाव, माळगाव, किन्हवली आणि वाशिंद या खेडोपाड्यातील मुलांचे प्रश्‍न जाणून घेतले. पाल्य व पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. या दरम्यान ’व्हीएसएम’चे पदाधिकारी अनेक समस्यांच्या मुळापर्यंत गेले. यामध्ये शिक्षणाची समस्या महत्त्वाची होती. सरकारतर्फे दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत आहे. परंतु, त्या पुढील शिक्षणाचा खर्च पालकांना करावा लागतो. ’’घरात अन्न शिजवायला पैसे नाहीत तर उच्च शिक्षण कसे घ्यायचे?’’ हा प्रश्‍न येथील पालकांना पडला होता. तर येथील नववी-दहावीत ८०-९० टक्के मिळवणारी मूलं मजुरी करून घरासाठी पैसे जोडत होती. येथील पालक आणि मुलांची ही व्यथा संस्थेने ऐकून घेतली.
पत्रकार व शिक्षक असलेल्या सुभाष हरळ यांचा ग्रामीण भागाशी उत्तम संपर्क होता. हरळ सर व ’विद्यादान’च्या पदाधिकार्‍यांनी मिळून खेडोपाड्यात ज्ञानगंगा पेरण्याचे कार्य सुरू केले. हरळ सर शहापूर व मुरबाड या भागात फिरून गरजू मुलांची यादी तयार करीत व अशा विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे देत असत. संस्थेतील पदाधिकारी या मुलांची नीट चाचपणी करून त्यांना मदतीचा हात पुढे करीत.
संस्थेने या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काही निकष ठरविले आहेत. या निकषांमध्ये बसणार्‍या संस्थेने शिक्षणात सहाय्य करण्यास सुरूवात केली.

संस्थेची वाटचाल व उपक्रम


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे येथील पालकांच्या मनात शिक्षणाबद्दलची जागरूकता निर्माण करणे. 
आपला पाल्य शिकला तर स्वत:चा, कुटुंबाचा व परिणामी गावाचा विकास करू शकतो, असा विश्‍वास मुलांच्या पालकांमध्ये ’व्हीएसएम’ने निर्माण केला. त्यानंतरच पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला संमती दिली. सर्वप्रथम संस्थेने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. विद्यार्थ्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, याचे निरीक्षण करायला त्यांनी सुरूवात केली. ग्रामीण भागातील मुलांमध्ये इंग्रजी विषयाबद्दल न्यूनगंड असल्याचे त्यांना प्रथमदर्शनी आढळून आले. तेव्हा, तो न्यूनगंड दूर करणे, या मुलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणे, त्यांना शहरातील मुलांशी जुळवून घेण्यासाठी मदत करणे, असे संस्थेचे कार्य सुरू झाले. विद्यादानाच्या या सत्कार्यास ग्रामीण भागातील मुलांनी व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ‘‘हळूहळू ’व्हीएसएम’चे नाव सर्वदूर पसरले व आपला पाल्य शिकावा म्हणून येथील पालक स्वत: संस्थेबद्दल माहिती घेऊ लागले’’, असे संस्थेच्या विश्‍वस्त स्वाती आगाते अभिमानाने सांगतात.
आपल्या जीवनात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम शिक्षण घेऊनच आपण आपला सर्वांगीण विकास साधू शकतो. परंतु, ग्रामीण भागात आणि आदिवासी पाड्यात शिक्षणाची वानवा प्रकर्षाने दिसून येते. शहरी मुलांसोबत खेड्यातील मुले शिकून मोठी व्हावीत ही इच्छा ठाण्यातील भाऊ नानिवडेकर यांच्या ध्यानी आली. भाऊ आणि त्यांच्या काही सहकार्‍यांनी ‘विद्यादान सहाय्यक मंडळा’ची उभारणी केली आणि आजही खेड्यातील मुलांचा विकास व्हावा हेच ध्येय अनुसरून आम्ही शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहोत.

स्वाती आगते
विश्‍वस्त, 
विद्यादान सहाय्यक मंडळ ट्रस्ट
’विद्यादान सहाय्यक मंडळा’तील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनीही या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे वाढविले. ग्रामीण भागातील मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी संस्थेने ’कार्यकर्ता पालक’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, संस्थेतील प्रत्येकाने दोन तृतीयांश मुलांची जबाबदारी घ्यावी. मुलांना अभ्यासात लागणारी मदत, आठवडाभरातील सर्व बाबींचा तपशील या ’कार्यकर्ता पालकांनी’ ठेवायचा. मुलांबरोबर संवाद साधणे, तो सुरळीत चालला आहे किंवा नाही हे बघणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
’विद्यादान सहाय्यक मंडळा’चे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. संस्था सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत संस्थेच्या एकूणच वाटचालीचा आढावा घेतल्यास लक्षात येते की ’व्हीएसएम’ने शहरातील उच्चशिक्षण ग्रामीण भागातील मुलांसाठी खुले केले. ’’विद्यादानद्वारे ठाण्याच्या दुर्गम भागातील १०० ते १२० मूलं आज उच्च शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. पूर्वी येथील मुलांना शिक्षक आणि बँकेत नोकरी यांसारख्या काही निवडकच नोकर्‍यांची माहिती होती. पण, ’विद्यादान’ने या मुलांना करिअरच्या नव्या वाटा दाखवल्या. आज मंडळाचे विद्यार्थी अभियांत्रिकीपासून ते कॉर्पोरेट ऑफीसमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत’’, असे ’व्हीएसएम’च्या रंजना कुलकर्णी सांगतात.
२०१३-१४ या काळात मंडळाचे २५ विद्यार्थी विविध महाविद्यालये आणि शाळांंमधून उत्तीर्ण झाले. येत्या काळात ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना मंडळाच्या छत्रछायेखाली आणण्याचे ’व्हीएसएम’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर गुणवत्ता शिक्षण देण्यावर मंडळाचा विशेष भर असतो. 
’विद्यादान सहाय्यक मंडळा’ने सुरू केलेला हा जग्गनाथाचा रथ अखंडपणे चालावा यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज संस्थेने उभी केली आहे. मंडळ बाल्यावस्थेत असताना सुभाष हरळ यांनी काही कारणास्तव: साथ सोडली. परंतु, मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी ग्रामीण भागात नुसता विस्तार नाही केला तर १४५ ते १५० कार्यकर्तेही जोडले. ‘कार्यकर्ता हीच आमची जमेची बाजू’ असल्याचे मंडळाचे पदाधिकारी आवर्जून सांगतात. 
आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यावरच आमचा भर असल्याचेही संस्थेचे पदाधिकारी सांगतात. ’व्हीएसएम’चे कार्य पाहून आफ्रिकेचे गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांचे वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही.

Education is the most 
powerful weapon 
which you can use to change the world.

संपर्क :

विद्यादान सहाय्यक मंडळ ट्रस्ट
९९६९४१७४२८
VSM Aurangabad participation in Aurangabad VEDH on11.01.2015


 VSM has always believed in overall development of children. VSM has been actively creating opportunities for it's students to gain various experiences through Shibirs, VEDH program by IPH and many more workshops and extra curricular activities organized throughout the year.




VSM recently participated VEDH in Aurangabad on 11th January 2015. Vocational Education, Direction and Harmony (VEDH) is a career perspective conference, which Institute for Psychological Health (IPH) started organizing way back in 1991.

Dr. Sujata Kelkar, who is VSM Karyakarta based at Bhusalval traveled to Aurangabad for VEDH event and was coordinator & the lead for this event. Following is a brief report on the event by Sujata Tai.

Today, we are enlightened by the narrations and the journey of lives, which are encouraging to others. Our distinguished guests who shared their experiences were:
1. Sonam Wangchuk who is known for his tremendous work at Mukta Vidhyapeeth in Ladakh.
2. Ashwini Deshpande is an Elephant designing company Director.
3. Krishnakant Mane, blind person with a huge and best vision, who is founder of ORCA.
4. Kaveri and Deepak Nagargoje, inspired by respected Amte family shared experience of Shantiwan at Beed dist.
5.Vaishali Samant renowned singer.


Shared with them on the subjects like shaniwarchi diary won by Geeta tai, exchanged email ids, told them about next years enrollments. Highlight is all VSM students and karyakartas could meet Dr. Nadkarni in person.


Thanks and Regards,
Dr. Sujata Kelkar

Saturday, 17 January 2015

Subject :  Awareness campaign of VSM at Runwal Plaza Co-operative Housing Society, Vartak Nagar.

Objective : The noble cause of VSM to reach maximum people. Get donor's or karyakarta's.


Format of participation :
 The society had fun fair for three days in their premises. There were various stalls which included games, food and dress material . NGO stall was only by VSM.


Date and Time : 26th, 27th 28th December from 7.30 pm- 10 pm.
Reference : The first Donor's meet (Friends of VSM program) arranged by VSM on 20th December 2014. 
Co-ordinator for this stall : Dr. Annapurna Kamat, Mr. Arun Joshi, Mr. Deepak Joshi. Students - Bharat Kadam and Shubham Sakpal.
Charges for stall : Rs. 500/- for three days. But was waived on request of Dr. Annapurna Kamat.
Material utilised : Two banners, 50 appeal patrak and 10 pamplets. Pamplets were distributed only to those who showed interest. Rest were returned to office.

Response for stall :
1. 25 people visited the stall and were given information about VSM.
2. Their contact information was noted.
3. Some of the visitors showed interest in joining VSM.
4. Collected donation of Rs. 7,500/-.  Out of which Rs. 5,000/- was given by a donor on occasion of his daughter's birthday. 

Followup action :
1. Followup calls are going to be done by Dr. Kamat.
2. They will be informed about joining as donor or giving us references. Their skill sets will be noted

3. Respective donor's were given thank you letter and receipt from VSM.
Learnings from this event :
1.The main objective was to make people aware of VSM and seek like minded people as Karyakarta for the noble cause ( jyotase jyot jalate chalo. Premaki ganga jalato chal.).

2. Students -Shubham Sakpal and Bharat Kadam ( local VSM students) were also present. Their presence helped us to to demonstrate that how VSM supports the upliftment of under priviledged children in society.

3. Overall  the response was good. It was a long week end and most of the people from society were out of station. Yet from the people who were present gave a good response.

Message for VSM family members :
Doing Good is a simple and universal vision. A vision to which each and every one of us can connect and contribute to its realization. A vision based on the belief that by doing good deeds, positive thinking and affirmative choice of words, feelings and actions, we can enhance goodness in the world.
Dont loose any opportunity to spread word about the noble cause as good work is infectious. There are many people around us who are looking forward to do a good act.

Thanks and Warm Regards,
Dr. Annapurna Kamat
Mr. Arun Joshi
Mr. Deepak Joshi